शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या उपस्थितीत शारदाश्रम शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

SHARE NOW

शिरगाव :

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रम शाळा व आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयाचा पहिला दिवस आणि प्रवेशोत्सव पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवर, पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, पाठ्यपुस्तके तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य व स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचेही वितरण करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी डॉ. कारेकर यांनी विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात नवे संकल्प करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद व समन्वय आवश्यक असून सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा देत, शाळेने पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. तसेच शाळेचा स्वच्छ, सुंदर व प्रेरणादायी परिसर पाहून समाधान व्यक्त केले.

Advertisement

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई मुंडे, शारदाश्रमचे मुख्याध्यापक विजय लोखंडे, देवळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश फरताडे, शिक्षक संतोष चव्हाण, मच्छिंद्र कापरे, हनुमान सुरनर, बद्रीनारायण पाटील, रामभाऊ घुगे, अमित वावरे, लक्ष्मीकांत ठाकूरद्वारे, धनंजय नाईकवाडे, राधेश्याम वारे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळा प्रवेशोत्सव आनंदी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

फोटो: शिरगाव येथील आश्रमशाळेत प्रवेशोत्सव निमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके व दप्तराचे वाटप शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page