तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे*:

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यक्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न झाली. कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे शहरातून 1460 लाभार्थी सहभागी. केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचावेत या दृष्टीने तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यक्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी झाली. केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाद्वारे या संकल्प रथाची रचना करण्यात आली. केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ मिळावा व सर्वांना या योजनांची माहिती व्हावी हा या विकसित भारत संकल्प यात्रेचा मूळ हेतू होता . तळेगाव दाभाडे शहरांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा रथ सकाळी दहा ते एक या वेळेत नगरपरिषद कार्यालय मारुती मंदिर चौक येथे व दुपारी दोन ते पाच या वेळेत मराठा क्रांती चौक येथे आला होता या कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे शहरातून 1460 लाभार्थी सहभागी झाले होते. वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांनी माहिती घेतली.

Advertisement

तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री स्वनिधी,प्रधानमंत्री स्वनिधीसे समृद्धी, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रधानमंत्री उज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना (नागरी ) प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, बँकांमार्फत विविध कर्ज योजना इत्यादी योजनांची माहिती यावेळी नागरिक व लाभार्थी यांना देण्यात आली.

  1.  या कार्यक्रमाचे सर्व नियोजन तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत करण्यात आले होते. विकसित भारत संकल्प यात्रेचे विशेष आकर्षण हा संकल्प परत असून विविध योजनांची माहिती देणारी छायाचित्रे व जनजागृती पर बॅनर पोस्टर्स या रथावर लावण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी नागरिक उपस्थित होते तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित त्यांना आपला संकल्प विकसित भारत शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर वाघमारे यांनी केले तसेच मुख्याधिकारी एन के पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page