भारतीयांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांच्या बाबतीत अभद्र वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
तळेगाव दाभाडे* :
लाखो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्या बाबतीत अभद्र वक्तव्य करून आपल्या अकलेचे तारे तोडणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली. तसे निवेदन तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव आवताडे यांना देण्यात आले.

याप्रसंगी तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशोकभाऊ दाभाडे,माजी नगरसेवक संतोषभाऊ दाभाडे पाटील , प्रदेश संयोजक सचिनभाऊ टकले,खजिनदार विनायक भेगडे , संघटन मंत्री रविंद्र साबळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभाताई परदेशी, जेष्ठ नेत्या रंजनीताई ठाकुर, सरचिटणीस निर्मलभाई ओसवाल, उपाध्यक्ष सचिन जाधव , हिम्मत पुरोहित,सागरभाई शर्मा,सतिशभाऊ पारगे,मुदुलाताई भावे, सुधीर खांबेटे,सुधाकरजी घनशेट्टी, सोशल मीडियाचे अध्यक्ष ऋषीकेश सुतार, संध्या जाधव ,स्मिताताई पोरे,नामदेव मदने, महावीर कणमुसे, भास्कर रेड्डी, अनिल वेदपाठक, संदीप गटे,बाळासाहेब कडुसकर, गजानन राजहंस,नाना गुंजाळ , तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी/ माजी पदाधिकारी उपस्थित होते.






