राष्ट्रपती डॉ. ए. पी .जे .अब्दुल कलाम जयंती” वाचन प्रेरणा दिन “बालविकास विद्यालयात साजरा.
तळेगाव दाभाडे :
स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या बालविकास विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताचे राष्ट्रपती डॉ .ए .पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेटे , उपाध्यक्ष श्री. सुभाष खळदे, सचिव श्री. किशोर राजस ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .नूतन कांबळे व इतर मान्यवर उपस्थित यांच्या हस्ते राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिकानी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा देऊन वाचनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी विद्यालयांमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये विविध पुस्तकांचा , आत्मचरित्र, ज्ञानकोश, विश्वकोश, शब्दकोश कथा, कादंबरी ,गोष्टीची पुस्तके, अशी इंग्रजी व मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारांचे प्रदर्शन भरवले होते. विद्यालयाला पाच ते सात हजार पुस्तकांची सुसज्ज असे ग्रंथालय उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थी अगदी मनसोक्त मनमुराद आनंद घेत असतात. ग्रंथालयातर्फे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात जसे ,प्रत्येक महिन्यात उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षक वाचकांची यादी जाहीर केली जाते. विद्यार्थ्यांना स्वग्रंथालय सारखे उपक्रम दिले जातात. प्रत्येक वर्गाला ग्रंथालयाची स्वतंत्र अशी तासिका आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल पुस्तके उपलब्ध करून दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांकडून वाचलेल्या पुस्तकाबद्दल अभिप्राय लिहून घेतले जातात, शाळेच्या आधी एक तास व शाळेनंतर विद्यार्थ्यांना ग्रंथालयात बसून पुस्तके वाचण्याची व्यवस्था ही विद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे . विद्यार्थी स्वतः ग्रंथालयात जाऊन पुस्तके हाताळून ती मनसोक्त वाचनाचा आनंद घेतात. तसेच पालकांसाठी , व आजूबाजूच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारे सार्वजनिक वाचनालय याचा सुद्धा सर्व वाचक आनंद घेतात, या सर्वांची जबाबदारी विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ. कांचन क्षीरसागर यांच्याकडे आहे.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष श्री. सुभाष खळदे, सचिव श्री. किशोर राजस, खजिनदार श्री . सुनील कडोलकर, श्री. सुरेश चौधरी, श्री. गनिमीया सिकीललकर ,श्री. शिवाजीराव आगळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ नूतन कांबळे, कार्यालयीन अधीक्षक सौ. सुजाता कुलकर्णी, सर्व विभाग पर्यवेक्षक शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका चौधरी व आभार सौ. कांचन क्षीरसागर यांनी केले. सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.






