स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा अनाथाश्रम व वृद्धाश्रमात संवेदना व सेवारुपी मदतीचा हाथ.
तळेगाव दाभाडे :
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तर्फे विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा आदर्शवत उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून मधुबन केअर सेंटर वृद्धाश्रम, जीवन अंकुर अनाथाश्रम आणि अजित फाउंडेशन येथील अनाथाश्रम या संस्थांना विविध प्रकारच्या उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, ब्लॅंकेट्स, सॅनिटरी नॕपकीन, बिस्किटे , शालेय वस्तू, धान्य, तसेच दिवाळी फराळ यांसारख्या वस्तू मनापासून गोळा करून या संस्थांना वाटप करण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना दृढ झाली.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा मॕडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून समाजाप्रति संवेदनशील राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या समाजसेवा, दानशीलता आणि सहवेदना या मूल्यांना उजाळा देणारा ठरला. या उपक्रमाचे नियोजन हे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका,पर्यवेक्षक ,सर्व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी यांनी केले होते.
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री दादासाहेब उऱ्हे सर, शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे मॅडम ,कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे, सचिव श्री मिलिंद शेलार सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील अशाच समाजापयोगी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.






