मावळ तालुकास्तरीय ५२ व्या विज्ञान प्रदर्शनात ठाकर, गुंड, दाउतखानी, ताते प्रथम

शिरगाव :

मावळ तालुकास्तरीय विद्यमा प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून जयेश ठाकर व नीतिशा दाउतखानी (दिव्यांग) तर उच्च प्राथमिक गटातून श्रीकृष्ण गुंड व ऋतुजा ताते (दिव्यांग) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती शिक्षण विभाग मावळ, मावळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ व पै.सचिन शेळके इंद्रायणी इंग्लिश स्कुल तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ता. ३ व ४ जानेवारी रोजी इंद्रायणी इंग्लिश स्कुल तळेगाव या ठिकाणी संपन्न झाले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन इंद्रायणी स्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तर विज्ञान प्रदर्शन बक्षिस वितरण इंद्रायणी इंग्लीश स्कुलचे संजय शेळके, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, विस्ताराधिकारी शोभा वाहिले, इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या रत्नमाला कापसे, मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश सुतार, पंचायत समिती विषय तज्ञ ज्योती लावरे, विज्ञान अध्यापक संतोष भोसले, मनोज पवार, चंद्रकांत मुरूमकर उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनात ७९ शाळांमधील ३१७ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. प्रदर्शनास पुणे जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांनी भेट देवून विद्यार्थ्याच्या प्रकल्पांची पाहणी केली. विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

विज्ञान प्रकल्पाचे परीक्षण हवेली तालुक्यातील विनायक वडघुले, प्रविण वाकडे, संदिप लोणकर, विजय फापाळे यांनी केले. विदयार्थी, शिक्षक, परीक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.

गटनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थी, शिक्षक, परिचर यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत मुरूमकर यांनी केले तर आभार विठ्ठल माळशिकारे यांनी मानले.

विज्ञान प्रदर्शनाचा निकाल :

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (९ ते १२) :

प्रथम क्रमांक – जयेश तुकाराम ठाकर, पवना विद्या मंदिर पवनानगर, द्वितीय क्रमांक : निकिता शशिकांत भारुड, आश्रमशाळा कामशेत, तृतीय क्रमांक – शंतनू प्रकाश कांबळे, वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव.

Advertisement

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (९ ते १२) दिव्यांग :

प्रथम क्रमांक – नीतिशा मंगेश दाउतखानी, नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे, द्वितीय क्रमांक – आकाश पुंडलिक पुजारी, छत्रपती शिवाजी विद्यामंदिर कान्हे, तृतीय क्रमांक – अभय गणेश नेवसे, नवीन समर्थ तळेगाव दाभाडे.

उच्च प्राथमिक गट (६ ते ८) :

प्रथम क्रमांक – श्रीकृष्ण नागनाथ गुंड, रामभाऊ परुळेकर विद्यालय तळेगाव दाभाडे, द्वितीय क्रमांक – आर्या धरकुडे, प्रतिक विद्या निकेतन निगडे, तृतीय क्रमांक – आरुष साहू, इंद्रायणी इंग्लिश मेडीअम स्कूल तळेगाव दाभाडे.

उच्च प्राथमिक गट (६ ते ८) दिव्यांग :

प्रथम क्रमांक – ऋतुजा अंकुश ताते, श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर कान्हे, द्वितीय क्रमांक – प्रणव निलेश हुलावळे, पंडित नेहरू विद्यालय कामशेत, तृतीय क्रमांक – अथर्व महादेव कट्टे, नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे,

निबंध :

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (९ ते १२) :

प्रथम क्रमांक – ऋतुजा अरविंद पैठणे, श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर कान्हे, द्वितीय क्रमांक – नंदिनी सुरेश खरमारे, तृतीय क्रमांक सिद्धी बबनराव लंके सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे.

उच्च प्राथमिक गट (६ ते ८) :

प्रथम क्रमांक – गौरी तुकाराम सुतार, पवना विद्यामंदिर पवनानगर, द्वितीय क्रमांक – प्रणव निलेश हुलावळे, पंडित नेहरू विद्यालय कामशेत, तृतीय क्रमांक- प्रतीक्षा साळुंके, रामभाऊ परुळेकर विद्यामंदिर तळेगाव दाभाडे.

वकृत्व :

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (९ ते १२) :

प्रथम क्रमांक – जान्हवी श्रावण महाजन, इंद्रायणी ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे, द्वितीय क्रमांक – पूर्वा नवनाथ दाभणे, सोजर माध्यमिक विद्यालय कुरवंडे, तृतीय क्रमांक सोनिया विश्वास ओव्हाळ पंडित नेहरू विद्यालय कामशेत.

उच्च प्राथमिक गट (६ ते ८) :

प्रथम क्रमांक – आयुष प्रशांत चव्हाण, नवीन समर्थ विद्यामंदिर तळेगाव दाभाडे, द्वितीय क्रमांक- सिद्धी गजानन रंजवे, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा तळेगाव दाभाडे, तृतीय क्रमांक – कीर्ती किशोर बरबडे, बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा.

शिक्षक गट (माध्यमिक) :

प्रथम क्रमांक – अजित डुंबरे, आश्रमशाळा कामशेत, द्वितीय क्रमांक – सुप्रिया केदारी, लिली इंग्लिश मेडीअम ज्युनिअर कॉलेज मळवली.

शिक्षक गट (प्राथमिक) :

प्रथम क्रमांक – मैना सरवदे, जिल्हा परिषद शाळा ब्राम्हणवाडी, द्वितीय क्रमांक – शुभांगी शिंदे, प्रज्ञानबोधिनी इंग्लिश स्कूल शिरगाव.

परिचर गट :

प्रथम क्रमांक – गणेश देशपांडे, सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page