मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाच्या वतीने सुधा भारती वाचन जागृती या शीर्षकाखाली एक अद्वितीय कार्यक्रम संपन्न.
तळेगाव दाभाडे:
मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाच्या वतीने सुधा भारती वाचन जागृती या शीर्षकाखाली एक अद्वितीय कार्यक्रम दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी संपन्न तळेगावातील आठ शाळांमधील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात अत्यंत उत्साहात भाग घेतला. सुप्रसिद्ध लेखिका खासदार आणि इन्फोसिसचे अध्यक्ष माननीय श्री सुधाजी मूर्तींनी लिहिलेल्या गोष्टी माणसांच्या या पुस्तकाच्या प्रती या मुलांना वाचनासाठी दिल्या नंतर जवळजवळ तीन आठवड्यांनी त्यांच्याकडून त्यांनी वाचलेल्या आणि त्यांना आवडलेल्या कथेचे रसग्रहण लिहून घेण्यात आले.जवळ जवळ सातशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला होता. या उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ हा दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर विजया भंडारी दादा दादी पार्क या ठिकाणी संपन्न झाला.
संपादक माननीय श्री सुरेश साखळकर अध्यक्षस्थानी होते. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक गीतकार श्री विजय कुवळेकर उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक काळोखे व तळेगावातील सुप्रसिद्ध वक्ते लेखक डॉक्टर शालिग्राम भंडारी हेही या समारंभास उपस्थित होते.संस्थेच्या कार्यकारणीचे सर्व सभासद उपस्थित होते. या विद्यार्थ्यांच्या आलेल्या रसग्रहणापैकी दहा रसग्रहणे अतिशय उत्तम होते म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आले. त्याचप्रमाणे शाळांना गौरविण्यात आले याप्रसंगी श्री कुवळेकर, श्री अशोक काळोखे, डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि श्री सुरेश साखळकर या प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन करून भविष्यकालीन अशाच उपक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या समारंभासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि विद्यार्थी पालक शाळांचे मुख्याध्यापक हे सर्व हजर होते. हा एक अतिशय अनोखा उपक्रम संपन्न झाला. आता मावळ तालुक्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे श्री कुसुमाकर दामले यांनी या उपक्रमासाठी पदरमोड करून चौदाशे कॉपीज आणल्या होत्या.
सूत्रसंचालन सौ अर्चना मुरूगकर यांनी केले. यादी वाचन सौ रश्मी थोरात यांनी केले.आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष श्री श्रीकृष्ण मुळे यांनी केले.