मावळ तालुका दिंडी समाज पदाधिकाऱ्यांची खासदार श्रीरंग बारणे यांना भेट – वारकऱ्यांच्या समस्यांबाबत निवेदन
मावळ:

मावळ तालुका दिंडी समाजाचे पदाधिकारी यांनी मावळ लोकसभेचे लोकप्रिय महा संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यालयात भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मावळ तालुका दिंडी समाजाच्या एकूण वाटचालीबाबत माहिती ह. भ. प. दिलीप महाराज खेंगरे यांनी दिली.
यावेळी बाबाजी महाराज काटकर यांनी पंढरपूरकडे वारकरी बांधव पायी दिंडीसाठी जात असताना येणाऱ्या विविध अडचणींबाबत खासदारांचे लक्ष वेधले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सक्रीय भूमिका घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी वारकरी संप्रदायाविषयी आपली श्रद्धा व्यक्त करत,
“मी पंढरीची वारी अनेक वर्षांपासून करत आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे काही काम करावे लागेल, ते नक्की करीन आणि त्याला मी माझे भाग्य मानेन,” असे आश्वासन दिले.
या प्रसंगी मावळ तालुका दिंडी समाजाचे ह. भ. प. नरहरी म. केदारी, ह. भ. प. राजाराम शिंदे, ह. भ. प. बाबाजी म. काटकर, ह. भ. प. गणेश म. जांभळे,
तसेच नारायणराव ठाकर, गणेशभाऊ काजळे, प्रदीपभाऊ हुलावळे, माऊली जांभूळकर, शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर, नवनाथसेठ हारपुडे, मदनभाऊ शेडगे, सोमनाथ सेठ कोंडे, विशाल हुळावळे, मंगेश हुळावळे, पोलीस पाटील अतुल असवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे खासदार श्रीरंग आप्पांनी स्वागत करून सन्मान केला.






