अस्मिता प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थीनींना समुपदेशन उपक्रम
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये मावळ भूषण मामासाहेब खांडगे सभागृहात अस्मिता’ प्रकल्पा अंतर्गत मुलींना समुपदेशन करण्याचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने नुकताच संपन्न झाला. रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष
मिलिंद शेलार यांनी या उपक्रमांचा उद्देश मुलींच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, आणि सुरक्षिततेला चालना देणे मुलींच्या सशक्तीकरणाचे महत्त्व समाजातील त्यांची भूमिका आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता आहे. असे मत मनोगतात व्यक्त केले.
सर्वांगीण विकासाकरिता स्वच्छतेचे महत्व डॉ.सुरभी नांगरे यांनी विद्यार्थिनींना पटवून दिले. ‘गुड टच, बॅड टच’, ओळखून स्वसंरक्षण करता आले पाहिजे वेळ प्रसंगी पालकांना,शिक्षकांना सांगितले पाहीजे असे वक्तव्य दामिनी पथक मार्गदर्शक पोलीस कॉन्स्टेबल वैशाली कंद यांनी केले. बाल्यावस्था ते युवावस्था यातील स्थित्यंतर फुलपाखराच्या उदाहरण देऊन अस्मिता आणि सशक्तीकरणाविषयी उपस्थित विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्मिता लोंढे यांनी केले. स्वरक्षण व आत्मसंरक्षण कराटे प्रशिक्षण कराटे शिक्षक प्रशांत भालेराव यांनी प्रात्यक्षिकातून दिले.
स्वसंरक्षण ही काळाची गरज असून भूलथापांना न भुलता स्वविकास साधावा असे प्रकल्प प्रमुख व कार्यक्रमाच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी व्यक्त केले.संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळीदामिनी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल स्वाती टेमकर प्रकल्प प्रमुख रजनीगंधा खांडगे सुवर्णा मते,पांडुरंग पोटे, ज्योती नवघणे, उमा पवार, रेखा भेगडे उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुनिता खोबरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रावसाहेब शिरसाट यांनी मानले.