आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी माधव खांडेकर केंद्रे यांची मुदतीपूर्वीच पदोन्नतीने लातूरला बदली
आळंदी( प्रतिनिधी ): आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची आळंदीतील दोन वर्ष कार्यकाळ पूर्ण होत नाही तोच त्याची पदोन्नतीने आळंदी नगरपरिषदेतून थेट लातूर महानगरपालिकेत उपायुक्त पदी पदोन्नती त्यांनी बदली करून घेतली. यामुळे आळंदी नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर मुख्याधिकारी तथा प्रशासक पदी नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची सोलापूर जिल्हा बदल करून आळंदी नगरपरिषद ( पुणे ) येथे बदली झाली आहे.
आळंदीचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पदोन्नतीने बदली करून घेतल्याने त्यांचा नगरपरिषद कर्मचारी वृंद यांनी निरोपाचे दिनी फुलांचे पायघड्या घालून स्वागत, सत्कार करीत निरोप दिला. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती पदोन्नतीने झाली. यामुळे आळंदी नगरपरिषदे मध्ये फुलांच्या पायघड्यांनी त्यांचे निरोपाचे दिनी स्वागत करीत निरोप देण्यात आला. विविध मान्यवर, सेवाभावी संस्था, व्यक्ती, पदाधिकारी यांनी त्यांना भेट वस्तू भेट देत अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आळंदी नगरपरिषद कर्मचारी वृंद यांचे तर्फे श्रींची मूर्ती, पगडी, शाल, श्रीफळ देत सन्मान करण्यात आला. याशिवाय शहरातील अनेक मान्यवरांनी देखील सत्कार करीत निरोप दिला. शिवतेज मित्र मंडळ, आळंदी ग्रामस्थ,पदाधिकारी आदी मान्यवरांनी देखील सत्कार केला.
यावेळी नगरपरिषद विविध विभाग प्रमुख संजय गिरमे, सचिन गायकवाड, सोमनाथ धरम, विष्णूकुमार शिवशरण, अर्जुन घोडे, श्रद्धा गर्जे, सीमा चारभे, मयुरी पाटोदार, संगीता येलमेवाड, रेवती गोसावी, शशांक कदम, विलास भोसले, नाना घुंडरे, दिगंबर कुऱ्हाडे, मिथील पाटील,अरुण घुंडरे, संध्या जाधव ,वैशाली पाटील ,अमित घुंडरे, प्रसाद बोराटे, कर्मचारी वृंद, सेवाभावी संस्थांचे, पक्षाचे पदाधिकारी, नागरिक, ठेकेदार, सत्कारास उस्थितीत होते.
विविध मान्यवरांनी लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी कैलास केंद्रे यांची पदोन्नतीने बदली झाल्याने पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत संवाद साधला. केंद्रे यांना आळंदीत काम करताना अनेकांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांनी सर्वा चे आभार व्यक्त करीत आळंदीतून निरोप घेतला. यावेळी त्यांनी ज्यांना ज्यांना सहकार्य केले, मदत केली, कामे दिली असे बहुतेक मान्यवर निरोपास उपस्थित होते. पुढील वाटचालीस सुरुवात करण्यापूर्वी केंद्रे यांनी माऊलींचे मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी पदी माधव खांडेकर रुजू झाले. तत्पूर्वी माऊली मंदिरात श्रींचे दर्शन आणि आळंदी देवस्थान तर्फे सत्कार स्वीकारला. यावेळी देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर.