राजमाता जिजाऊ जयंती व युवा दिनानिमित्त शिक्षण मंडळाच्‍या संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

SHARE NOW

*तळेगाव दाभाडे*

Advertisement

दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी राजमाता जिजाऊ जयंती व युवा दिनानिमित्त शिक्षण मंडळाच्‍या प्रशासन अधिकारी श्रीमती शिल्‍पा रोडगे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी श्रीमती ममता राठोड मॅडम यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी सौ. सुवर्णा काळे मॅडम (नगरपरिषद तळेगाव दाभाडे अधिकारी ), शाळेचे मुख्याध्यापक श्री. केशव चिमटे व सर्व शिक्षक तसेच पत्रकार श्री. सोनबा गोपाळे उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी बालसभेतून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून दिली. नगरपरिषदेच्‍या सर्वच शाळांमध्‍ये राजमाता जिजाऊ जयंती व युवा दिनानिमित्‍त बालसभांचे आयोजन करण्‍यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page