भैरवनाथ विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरी ‘ ची संस्कारक्षम उपक्रमास प्रारंभ ज्ञानोबा माऊली नामजयघोषात संत साहित्य सुपूर्द

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी):

कुरुळी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात ‘ ओळख श्री ज्ञानेश्वरी ‘ ची या शालेय मुलांसाठी असलेल्या संस्कारक्षम उपक्रमाचा प्रारंभ श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या हस्ते झाला. हरिनाम गजरात प्रशालेस अभ्यासक्रमाचे साहित्य देखील यावेळी सुपूर्द करण्यात आले.

या प्रसंगी मुख्याध्यापक भाऊसाहेब थोरात , ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे अर्जुन मेदनकर, बाबाजी गवारी पाटील, आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळ माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे पाटील, कैलास माळशिकर, सोपान काळे आदी मान्यवर उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार तर्फे प्रशालेस माऊलींची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रतिमेचे पूजन, ग्रंथ पूजन हरिनाम गजरात झाले. यावेळी शालेय मुलासाठी हरिपाठ वाटप आणि भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातूस ग्रंथालयास संदर्भ ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सार्थ प्रत, सार्थ हरीपाठ आणि मुख्याध्यापक भाऊसाहेब थोरात यांचे सह सर्व उपस्थित शिक्षक यांचे कडे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले.

Advertisement

यावेळी प्रकाश काळे म्हणाले, ज्ञानदेवांचे संत साहित्य हे जगाला वाचविणारे साहित्य आहे. शालेय जीवनात मुलांना सुशिक्षित, संस्कारक्षम तसेच सुसंस्कृत बनविण्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम उपयुक्त आहे. यातून मुलांची एकाग्रता लागणार आहे. शाळेत आणि घरी मुलांची चंचलता कमी होऊन मुलांचे अभ्यासात लक्ष लागणार आहे. मुलांनी घरून आणलेला आईचा अन्नाचा डब्बा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्यासाठी दिलेला संत साहित्याचा शब्द रुपी हरिपाठ, श्री ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव या साहित्याचे डब्बा अशा दोन्ही डब्यांचे सेवन करायचे आहे. पुढे आपल्या जीवनात यावर मार्गक्रमण केल्यास यश निश्चित आहे. ज्ञानेश्वरी जीवन ग्रंथ असून तो आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाबाजी गवारी पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत मुलांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे यशस्वीस मुख्याध्यापक भाऊसाहेब थोरात यांनी अशा उपक्रमाची गरज आजच्या पिढीला कशी आहे हे सांगितले. तुकाराम गवारी, श्रीधर कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर आदी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्ती भुजाडे, संदीप सासवडे, राजकुमार गायकवाड, सरस्वती सोनवणे, सुवर्णा मोरे, कल्पना सरवदे, संगिता भगत, पुनम शिंदे, रसिका घाडगे शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाचे यशस्विते साठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कांचन बेल्हेकर यांनी केले. आभार सतिश नायकवाडी यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page