स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांचे विचार महाराष्ट्राला आणि काँग्रेस पक्षाला तारणहार ठरू शकतात.! काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार…

SHARE NOW

देहू:

Advertisement

काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 8 नोव्हेंबर हा स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांचा 77 वा जन्मदिन म्हणजे जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे फायर ब्रँड प्रवक्ते, सुशिक्षित सुसंस्कृत आणि अभ्यासू असणारे हनुमंत पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांनी शालेय शिक्षण मंत्री असताना पहिलीपासून इंग्रजी हा धडाडीचा निर्णय घेतला होता. पुढे बोलताना पवार म्हणाले की,काँग्रेसने या भारतात, या महाराष्ट्रात शाळा, कॉलेज, रस्ते, हॉस्पिटल्स, धरणे, रेल्वे, विमान सेवा सगळंच काही उभारले होते, पण कुठे मार्केटिंग केले नाही.पण या भाजप सरकारने सगळेच विकण्याचे धोरण नाही.. सत्तर वर्षात काँग्रेसने जे कमावलं ते अकरा वर्षात या सरकारने विकलं.. हे तरुण पिढीला वास्तव माहिती करून देण्याचे कार्य यापुढे काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केले..माजी सरपंच मधुकर कंद म्हणाले,स्वर्गीय रामकृष्ण मोरे देहूकर असल्याने त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली होती, देहूत हायस्कूल, प्रत्येक घरातील व्यक्तीला नोकरी, शैक्षणिक मदत, आरोग्य केंद्र आद्यवत करणे, नलजोड, रस्ते अशी पायाभूत कामे त्या काळी केल्या मुळे देहूचा विकास केला.. याप्रसंगी देहूचे माजी सरपंच मधुकर कंद पाटील, माजी जिप सदस्य माऊली काळोखे, देहू काँग्रेसचे माजी अध्यक्ष समन्व्यक रशीद धोंडफोडे,मावळ काँग्रेस समन्वयक वनीताताई देशकर, देहू शहर काँग्रेसचे अध्यक्ष रणजीत मोरे, देहू शहर काँग्रेस महिला अध्यक्षा माया सातपुते, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश मुसुडगे, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ.विवेकानंद मोरे, नंदकुमार काळे, भाऊसाहेब कुंभार, युवा नेते मनोज कंद पाटील, ज्येष्ठ पत्रकार संदीप पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.. याप्रसंगी स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार हनुमंत पवार यांच्या हस्ते अर्पण करून रामकृष्ण मोरे यांच्या स्मुर्तीस अभिवादन करण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page