देहूरोड येथे श्री गुरु नानक जयंती उत्साहात, नतमस्तक होण्यासाठी शीख बांधवांची गर्दी
देहूरोड:
गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा येथे श्री गुरु नानक देव महाराज यांचा ५५६ वा प्रकाश उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, अखंड पाठ, प्रभात फेरी आणि गुरू का लंगरचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
प्रभात फेरीत निशान साहिब चोले दी सेवा मलकीत सिंह गायडू परिवाराने सेवा दिली.अखंड पाठ साहिबची समाप्ती आज झाली.यात अखंड पाठाची सेवा अनेक परिवारांनी भक्तिभावाने पार पाडली.
कार्यक्रमात ज्ञानि सोहन सिंग जी, ज्ञानि हरभजन सिंग जी (वडगाववाले), रागी जथा प्रीतिंदर सिंग जी, रागी जथा गुरसेवक सिंग जी तसेच भाई मंजीत सिंह राजू यांनी कीर्तन दरबार सादर केला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे त्यांच्या पथकासह बंदोबस्तावर होते.
गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष गुरुमित सिंग रत्तू, उपाध्यक्ष परमजीतसिंग चटवाल, सचिव गुरुचरणसिंग राजू, खजिनदार महेंद्र सिंग यांनी संयोजन केले.
सायंकाळी बालकांचा सांस्कृतिक/कीर्तन कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.कार्यक्रमाच्या शेवटी अरदास करून गुरू का लंगरचा भाविकांनी लाभ घेतला.येथील गुरुद्वारा अनेक वर्षं जुना असल्याने पंधरा किलोमीटरहुनही शीख बांधव दर्शनासाठी आले हॊते.






