कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिसांचे देहूत पथसंचलन वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सज्ज

SHARE NOW

देहूगाव :

श्रीक्षेत्र आळंदी येथील कार्तिकी एकादशी यात्रा समीप आली असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येत आहेत. आळंदीतील दर्शनानंतर हेच वारकरी भक्त संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या दर्शनासाठी देहू नगरीत दाखल होतात. यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, दर्शन शांततेत आणि सुरळीत पार पडावे, यासाठी देहूरोड पोलिस स्टेशनच्यावतीने शनिवारी (ता. ८ नोव्हेंबर) पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले.

 

सहाय्यक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर आणि देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन पार पडले. देहूतील चौदा टाळकरी कमान येथून सुरुवात झालेल्या या संचलनाचा समारोप जुनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आला.

Advertisement

 

या पथसंचलनात देहूरोड पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी, दंगल काबू पथक तसेच पोलिस व्हॅनचा सहभाग होता. यात्रेच्या काळात वाहतूक नियंत्रण, सुरक्षेची दक्षता आणि वारकऱ्यांना आवश्यक ती मदत तत्काळ मिळावी, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

 

*वारकऱ्यांना मदतीचे आवाहन* “कार्तिकी एकादशी निमित्त देहूत दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्यांना दर्शन शांततेत घेता यावे, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. कोणत्याही भाविकांना अडचण आल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

— बाळासाहेब कोपनर, सहाय्यक पोलिस आयुक्त


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page