“मायेचा हात दिवाळीतही — रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC तर्फे आदिवासी वस्तीवर फराळ व ब्लॅंकेट वाटप”
तळेगाव दाभाडे :

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. चे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष जी खांडगे यांच्या विशेष सहकार्याने, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. आणि समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “मायेचा हात” या सामाजिक उपक्रमांतर्गत दिवाळी फराळ आणि ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
हा उपक्रम रविवार, दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मायेचा हात सोशल फाउंडेशन, माऊली नगर (कामशेत) तसेच मावळ तालुक्यातील सावळा या दुर्गम आदिवासी भागात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाद्वारे आदिवासी समाजातील तसेच कातकरी वस्तीत राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळी फराळासह ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच या सामाजिक कार्याची खरी पावती होती.
सर्व रोटरी सदस्यांनी एकत्र येऊन या दिवाळीला खऱ्या अर्थाने “आनंदाची दिवाळी” बनवली. कार्यक्रमानंतर सर्व सदस्यांनी खांडी येथे रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला.
हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रोटरी सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.रो संतोषजी खांडगे, रो. प्रवीण भोसले, रो. संदीप मगर, रो. बाळासाहेब शिंदे, रो. विन्सेंट सालेर, रो. दशरथ जांभुळकर, रो. हिरामण बोत्रे, रो. मच्छिंद्र घोजगे, रो. अजय पाटील, रो. राहुल खळदे, रो. शरदचंद्र कोतकर, रो. योगेश शिंदे, रो. युवराज पोटे, रो. रवींद्र पवार, रो. विनायक जगताप, रो. सुमती निलवे, आणि रो. गौरी पाटील.






