भव्य रक्तदान शिबिराचे व आरोग्य शिबिराचे आयोजन..

SHARE NOW

कोंढवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिराचे व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.

 

 

या रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थापक चंद्रकांत (बाबा) भारस्कर व अध्यक्ष नितीन नडेकर यांनी केले होते.

Advertisement

 

कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित अण्णा जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच या उपक्रमासाठी विशेष सहकार्य परशुराम अण्णा भंडारे, सुरेश धेंडे, सोमनाथ भंडारे व रवी भारस्कर यांनी केले.

 

समाजातील गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी या कार्याचे कौतुक केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page