पैसाफंड प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे :
मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी पैसाफंड प्राथमिक शाळा दोन्ही विभागात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनिता लादे मॅडम व शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री विठ्ठल दरेकर सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना आधारित भाषणे ,गीते व घोषवाक्य सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.लादे मॅडम यांनी आपल्या मनोगतून सामाजिक कार्याची माहिती देत शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.आशा लबडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समानता न्याय शिक्षणाचे महत्व समजावले.शिक्षक मनोगत श्री.अमित चिंतल सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण बोंबले सर ,सौ मानकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार श्रीम.ज्योती दुर्गे सौ शितल जगताप मॅडम यांनी मानले .शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.






