राव कॉलनीत १३५ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे:
बुद्धमय विचार मंच व राव कॉलनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राव कॉलनी समाज मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात व मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे व बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते विशाल वाळुंज, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक अमीर मुलाणी, सिनेअभिनेत्री धनश्री कांबळे, संतोष गराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गदर्शन करण्यात आले.
विशाल वाळुंज म्हणाले
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला धर्म हा समानता, स्वाभिमान आणि न्यायाचा मार्ग आहे. आजही समाजात टिकून असलेला जातिवाद हा देशाच्या प्रगतीस अडथळा आहे. तो संपवण्यासाठी प्रत्येकाने ठाम भूमिका घेऊन बाबासाहेबांच्या विचारांवर चालणे ही काळाची गरज आहे.”*
ॲड.संतोष गराडे म्हणाले, “शिक्षण हाच खरा बदलाचा मजबूत पाया असून, त्यातूनच समाजाची खरी प्रगती शक्य आहे.”
धनश्री कांबळे म्हणाल्या “एकजूट, संघटन आणि जागरूकता यामुळेच समाज अधिक सक्षम होतो.” बुद्धमय विचार मंचाचे संजय गरुड अमोल गंगावणे सुनील गंगावणे संजय कडलक राजू जाधव बाळासाहेब कडाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गरुड यांनी केले. वैशाली गंगावणे यांनी आभार मानले.






