मावळ तालुकास्तरीय आंतर शालेय ‘खो-खो स्पर्धा’ 2025 मध्ये विजेते पदाची परंपरा कायम ठेवत पीएमश्री संत ज्ञानेश्वर प्रशालेचे अभूतपूर्व यश.
मावळ :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल, सदुंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “तालुका स्तरीय आंतर शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26” मधील “खो-खो” या क्रीडा प्रकारात आमच्या पीएमश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. 6 ने 17 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या गटात रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन तळेगाव दाभाडे तर 14 वर्ष वयोगटामधील मुलींच्या स्पर्धेत तुळजाभवानी माध्यमिक शाळा सोमाटणे यांचा पराभव करून दोन्ही गटात “प्रथम क्रमांक” प्राप्त करून “गोल्ड मेडल” (सुवर्णपदक) मिळवत यशाची मागील वर्षाची परंपरा कायम ठेवली…
जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्या मावळ तालुक्याचे नेतृत्व हे खेळाडू करणार आहेत यशस्वी खेळाडुंना प्रेरणा देणारे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विजयकुमार सरनाईक साहेब,गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे मॅडम, प्रशासनाधिकारी श्री. सुदाम वाळुंज साहेब, मुख्याध्यापक श्री. संजय चांदे सर, श्री. सुनिल जगताप व त्यांचे सर्व सहकारी व मार्गदर्शक शिक्षकांचे आणि विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व आभार.






