मावळमध्ये पवना नदीच्या पाण्यात अडकलेल्या महिलेची तळेगाव दाभाडे /शिरगाव पोलिस व वन्यजीव रक्षक संस्थेच्या मदतीने सुखरूप सुटका
गोंडुब्रे :-
साधारण ४८तासा पासून मावळ तालुक्यात पावसाचा हाहाकार उडाला असताना १९ ऑगस्ट २०२५रोजी रात्री साधारण साडे बाराच्या सुमारास गोंडुंब्रे येथील नदी लगत कोणी तरी वाचवा असे आवाज देत असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन ला ग्रामस्थांनी कळविले असता पोलीस प्रशांत सोनवणे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना दिली.गराडे यांनी लगेच संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला कळवले त्या अनुषंगाने जवळपासचे टिम सभासद विनय सावंत, कमलेश राक्षे तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे काही अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले ताबडतोब मुसळधार पावसात देखील मदत कार्य करत त्यांनी त्या महिलेस एका झाडाला लटकलेल्या अवस्थेमधून सुखरूप बाहेर काढलेले आहे.महिलेचे नाव
मिनाक्षी पारधे,वय ३० राहनार सोमाटणे असे असुन
त्या महिलेस प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.






