निधन वार्ता पांडुरंग भेगडे
तळेगाव दाभाडे:
खडकी येथील अम्युनिशेन फॅक्टरीतील सेवानिवृत्त पर्यवेक्षक पांडुरंग रामभाऊ भेगडे (वय ८४) यांचे शनिवारी(दि.१४) निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, तीन भाऊ, तीन बहिणी, सूना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक संतोष भेगडे, संजय भेगडे यांचे ते वडील, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांचे ते बंधू तर माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांचे ते चुलते होत.