जेष्ठ नागरिक संघ, आधार फाऊंडेशन लोणावळा यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी जपत पाणपोई बांधली.
लोणावळा :
या वर्षी उन्हाळा खूपच कडक आहे. उन्हा तान्हात गोर गरिबांसाठी आणि तहानलेल्या लोकांची तहान भागवण्यासाठी जेष्ठ नागरिक संघ, आधार foundation लोणावळा यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी जपत पाणपोई बांधली. पाणपोईचे उदघाटन लोणावळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्री श्रीधर पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
पाणपोई बांधण्यासाठी आधार फ़ौनडेशन चे अध्यक्ष प्रकाश पाठारे, हनुमंत साबळे, सत्यनारायण आगरवाल, शारदा आगरवाल दत्ता लाड व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखें, म्रुदुला पाटील, संध्या गव्हले, गोरख चौधरी, रश्मी शिरस कर, आणि सदस्यांनी सहकार्य केले. यां वेळी धीरूभाई टेलर उपस्थित होते.