*तळेगाव येथे बुध्द जयंती निमित्त धम्मपहाट*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने गुरुवारी(दि.२३) बुध्द पोर्णिमेनिमित्त धम्म पहाट कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५.३० वा.सुमारास तथागतांच्या पुजनाने व वंदनेने झाली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि माता रमाईं यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. वंदना व गाथा पठण बौध्दाचार्य बळवंत गायकवाड व आनंद ओव्हाळ यांचे नेतृत्वाखाली श्रामणेर शिबिरातील भंतेगण यांनी सामुहिक रित्या केले.बुध्दजयंतीचे महत्व व स्मारक समितीची भुमिका याबद्दल स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲड.रंजना भोसले यांनी माहीती सांगितली.यावेळी प्रबुध्द सुर संगम हा भीम बुध्द गीतांचा सदाबहार कार्यक्रम झाला. शाहीर दिलीप शिंदे ,वसंत डंबाळे ,मल्लिकार्जुन कांबळे बालगायिका आराधना गायकवाड,यांनी गायन केले. ढोलकी वादक सकटबंधू यांनी करुन श्रोत्यांची मने जिंकली.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी स्मारक समितीचे सचिव किसन थुल एल.डी.कांबळे संचालक,देवानंद बनसोडे, संजय गायकवाड,भागवत बि-हाडे,रूपेश घोडेस्वार,दिनेश गवई व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.