राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश खरात यांचा शिवसेना ठाकरे गट पक्षात जाहीर प्रवेश.
पिंपरी चिंचवड :
शिव वाहतूक सेना महाराष्ट्र अध्यक्ष कामगार नेते महेश पोरे व गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख महेश केदारी यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख गणेश खरात यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिव वाहतूक सेना महाराष्ट्र अध्यक्ष कामगार नेते महेश पोरे यांनी गणेश खरात यांची शिवसेनेच्या शिव वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. यावेळी अनेक शिवसैनिक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. गेल्या अनेक वर्षापासून गणेश खरात हे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते, त्यांनी गेल्याच महिन्यात धनगर समाजाच्या एसटी आरक्षण विषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण केले होते, परंतु राष्ट्रीय समाज पक्षांकडून सतत होणाऱ्या धूस्पुशीमुळे आपण गेल्या महिन्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख या पदाचा राजीनामा दिला आहे, व इथून पुढे शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्र राज्य शिव वाहतूक सेना पुणे जिल्हा या पदावर अविरत वाहन चालकांच्या सेवेत कार्यरत राहणार आहोत असे आश्वासन त्यांनी दिले.
गणेश खरात यांचे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाजकार्य पाहता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दयाची दखल घेत जबाबदारी सोपवली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गणेश खरात यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे त्यामुळे याचा फायदा पक्षाचे हात बळकट करण्यासाठी नक्कीच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या निवडीनंतर गणेश खरात यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






