अल्पवयीन मुलाकडून तरुणावर गोळीबार तळेगाव दाभाडे येथे खळबळजण घटना
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी दिनांक 23 रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
पूर्व वैमनश्यातून अल्पवयीन मुलाने तरुणावर गोळीबार केला.
यात गोळी तरुणाच्या खांद्याच्या आरपार गेली. तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी ही घटना घडली. आदित्य गणेश भेगडे( वय 27 राहणार भेगडे आळी तळेगाव दाभाडे तालुका मावळ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य भेगडे याचे एका अल्पवयीन मुलासोबत सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. तसेच अल्पवयीन मुलाचा विरोधक असलेल्या एका तरुणाच्या वडिलांसोबत आदित्य फिरायचा तसेच त्यांच्या घरी त्याचे येणे जाणे असायचे त्यामुळे देखील अल्पवयीन मुलाला आदित्य याच्याबाबत राग होता. त्यातून त्यांच्यामध्ये सोशल मीडियातून देखील एकमेकांना खुन्नस दिली जात होती.
दरम्यान आदित्य हा त्याच्या राहत्या घरासमोर मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दुचाकी वर बसून मोबाईल मध्ये गेम खेळत होता. त्यावेळी सतरा वर्षे अल्पवयीन मुलगा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत तेथे आला. आदित्य याच्या जवळ येऊन अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील पिस्तुलातून आदित्य याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या यातील एक गोळी आदित्य याच्या खांद्याच्या आरपार गेली. त्यानंतर 17 वर्षे अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार तेथून पळून गेले.
खांद्याला गोळी लागल्याने जखमी झालेला आदित्य हा स्वतः तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.
त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अल्पवयीन मुलांचा शोध सुरू आहे.
गोळीबार करणारा सतरा वर्षी अल्पवयीन मुलगा आणि जखमी झालेला आदित्य भेगडे त्यांच्यावर यापूर्वी देखील विविध गुन्हे दाखल आहेत.