माणसाने माणसासारखे वागावे, स्वप्ने पहा आणि ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत स्वप्ने बघा या विषयावर पहिले पुष्प गुंफताना , आणि माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे मला चांगला माणूस बनायचे आहे हे स्वप्न पहा, आजच्या घडीला त्याची फार गरज आहे असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांनी केले.
Advertisement
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे होते. यावेळी संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, सदस्य निरुपा कानिटकर, विलास काळोखे, संजय साने, परेश पारेख, रणजित काकडे, युवराज काकडे, राजेश म्हस्के, दीपक शहा, राजश्री मस्के, डॉक्टर रवी आचार्य, प्रभाकर ओव्हाळ, ज्ञानेश्वर दळवी, महेश शाह, रामभाऊ माने, प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे, यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भास्करराव म्हाळसकर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कलापिणी संस्थेचे मुख्य विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे यांना इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
शैलेश शाह यांनी स्वागत केले.डॉक्टर दीपक शहा यांनी यजूवेंद्र महाजन यांचा परिचय करून दिला. निरूपा कानिटकर यांनी आभार मानले.