राष्ट्रीय गणित दिवस इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागामध्ये उत्साहाने साजरा केला.
दिनांक 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागामध्ये उत्साहाने साजरा केला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, संस्थेच्या सदस्या निरूपा कानिटकर मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत प्राध्यापक तेलंग मॅडम यांनी केले. याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के मलगे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस पी भोसले सर आवर्जून उपस्थित होते. तसेच विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक खाडपसर आणि वरिष्ठ प्राध्यापिका भोसले मॅडम सुद्धा उपस्थित होत्या.
इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य मलगे सरांनी गणिताचे महत्त्व अतिशय समर्पक शब्दात विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच उपप्राचार्य भोसले सरांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून गणित विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे आभार मानले. गणित दिनानिमित्त प्राध्यापिका भोसले मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विज्ञान विभागातील एकूण नव विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी लाभलेले परीक्षक इंग्रजी विषयाचे प्राध्यापक विवी खेडकर सर, आणि मराठी विषयाच्या प्राध्यापिका एसव्ही झरेकर होते.
या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक नेणे सर व क्रीडा विभागातील प्राध्यापक थरकुडे सर आवर्जून उपस्थित होते. या स्पर्धेनंतर प्राध्यापक नेणे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे निवेदन गणित विभागाच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक पाटील मॅडम यांनी मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य मलगे सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन गणित विभाग प्रमुख प्राध्यापक एस आर जगताप व गणित विषयाच्या प्राध्यापिका पवार मॅडम यांनी सहकार्य केले.






