सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘इन्वेस्टीचर सेरेमनी
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे, मस्करनेस कॉलनी येथे सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. सरस्वती पूजन नंतर परेड घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.पालक, विद्यार्थी, शिक्षक या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. मतदानाच्या साह्याने निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना हेड गर्ल, हेड बॉय, डिसिप्लिन हेड, कल्चरल हेड, स्कूल स्पोर्ट्स कॅप्टन यांना शाळेच्या मुख्याध्यापिका रणजीता थंपी यांनी मोठ्या अभिमानाने हे पद बहाल केले. हे पद सांभाळताना विद्यार्थ्यांनी काय करणे अपेक्षित आहे याचे मार्गदर्शन केले. व त्यानुसार दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या न चुकता निस्वार्थीपणाने न डगमगता आम्ही त्या पार पाडू व अशी शपथ निवडलेल्या प्रतिनिधींनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी प्रभाळे व रूपरेषा हर्षल मुळे या शिक्षकांनी आखली