रोड क्रॉस करताना जखमी झालेल्या वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडुन जीवदान
वडगाव मावळ :
वडगाव मावळ येथे जाभुळ फाटा या ठिकाणी ऐक वानराचा रोड कॅास करताना दुचाकीची धडक बसुन ते वानर जखमी झाल्याची माहीती कमलेश लोकरे व अभिनंदन अडसुल यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना दिली माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी, दिगंबर पडवळ ,मयुर चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी वानर हे रोडच्या कडेला झाडा झुडुपात लपुन बसलेलं होत पन त्याला पायाला जास्तं दुखापत झाली होतीलगेच याची माहिती वन विभाग यांना दिली लगेचच काही वेळातच वन परिमंडळ अधिकारी एम एस हिरेमठ वनरक्षक पी.कासोळे वनरक्षक एस.मोरे हे घटनास्थळावर दाखल झाले.
वन विभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य यांनी जखमी वानरास सुखरुप पकडुन पुढील उपचारासाठी पुणे येथील भुगाव रेस्कु सेंटर ला पाठवले आहे
असे जखमी प्राणी आढळल्या किंवा लोक वस्ती मध्ये साप आढळुण आल्यास वन विभाग 1926 किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था 9822555004 या नंबर फोन करा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे