बनेश्वर मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे येथील प्राचीन बनेश्वर शिव मंदिरामध्ये गुरुवार दिनांक १०जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१०जुलै रोजी श्रीमंत सरदार. माजी नगराध्यक्ष अंजली राजे दाभाडे( माॅसाहेब) . श्रीमंत सरदार माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्र राजे दाभाडे. श्रीमंत सरदार चंद्रसेन राजे दाभाडे. श्रीमंत सरदार सत्यशील राजे दाभाडे. यांच्या हस्ते सकाळी ६: वाजता श्री बनेश्वर महादेवाचा अभिषेक होणार आहे. पादुका अभिषेक व पूजन सकाळी ९: वाजता. धुनी आरती सकाळी ११:३० वाजता. महाप्रसाद दुपारी १२: वाजलेपासून. महाआरती रात्री ८: वाजता. एकतारी भजन रात्री ८:३० ते १०:३० वाजेपर्यंत तसेच दिगंबर हरी कुलकर्णी यांचे भक्ती संगीत गायन हा कार्यक्रम देखील होणार आहे. तरी भाविक भक्तांनी आपल्या गुरुप्रती आदरभाव व ऋण व्यक्त करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती श्री बनेश्वर सेवा मंडळ व माजी नगरसेवक संतोष मारुती भेगडे यांनी केली आहे.






