मावळ तालुक्यातील टाकवे ते राजपुरी रस्त्याची दयनीय अवस्था; खड्ड्यांना कंटाळून नागरिकांनी रस्त्यावरच वृक्षारोपण
मावळ :

मावळ तालुक्यातील टाकवे ते राजपुरी रस्त्याची दयनीय अवस्था; खड्ड्यांना कंटाळून नागरिकांनी रस्त्यावरच वृक्षारोपण
मावळ तालुक्यातील टाकवे ते राजपुरी या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असून, मोठमोठे खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे अखेर स्थानिक नागरिकांनी अनोखा मार्ग अवलंबला आहे.
खड्ड्यांना विरोध करण्यासाठी, स्थानिकांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून वृक्षारोपण केले. या अभिनव आंदोलनामागे त्यांचा उद्देश होता की प्रशासनाचे लक्ष वेधून त्यांना दुरुस्तीचे गांभीर्य समजावे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरतात आणि अपघातांना निमंत्रण मिळते.
सामान्य प्रवासी, शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि रुग्णवाहिकांसाठीही हा रस्ता धोकादायक ठरला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या दुरवस्थेकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
नागरिकांनी प्रशासनास इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर प्रखर आंदोलन छेडले जाईल. या प्रकारामुळे प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.






