पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि.ला आणखी एक राष्ट्रीय स्तरावरील गौरव. १० व्या ऑल इंडिया अर्बन को-ऑप बँकिंग समिट अँड अवॉर्ड्स २०२६ मध्ये मानाचा पुरस्कार प्राप्त.
पुणे: सहकार बँकिंग क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रगती आणि नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे यांनी आणखी एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावत आपल्या यशात भर घातली आहे.
क्रेस्ट इन्फो मीडिया यांच्या वतीने आयोजित “१० वा ऑल इंडिया अर्बन को-ऑप बँकिंग समिट अँड अवॉर्ड्स २०२६” हा प्रतिष्ठित कार्यक्रम दि. ८ व ९ मे २०२६ रोजी हॉटेल दि वेस्टीन, कोरेगाव पार्क, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. देशभरातील २०० नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
राष्ट्रीय स्तरावरील या समारंभात बँकेस “बेस्ट कस्टमर सर्व्हिस इनेशेटीव्ह” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार बँकेचे वतीने अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष श्री बिपीनकुमार शहा बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, बँकेचे जेष्ठ संचालक जनार्दन रणदिवे, सुभाष नडे, विश्वनाथ जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके, बँकेचे IT विभाग प्रमुख श्री कैलास पवार यांनी स्वीकारला.
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड म्हणाले की, “हा पुरस्कार केवळ बँकेचा नसून आमच्या सर्व सभासद, ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाचा सन्मान आहे. ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक सेवा हीच आमची खरी ताकद असून भविष्यातही अत्याधुनिक बँकिंग सुविधा अधिक व्यापक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
ते पुढे म्हणाले, “पुणे पीपल्स को-ऑप. बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सामाजिक बांधिलकी जपणारी बँक आहे. या वर्षी अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आगामी काळात शाखा विस्तार आणि ग्राहक सेवेमध्ये अधिक गुणवत्ता आणण्यावर भर दिला जाणार आहे.
ग्राहकांचा वाढता विश्वास, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, पारदर्शक व्यवहार आणि समर्पित सेवा या बँकेच्या यशामागील प्रमुख घटक आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष, सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून बँक दिवसेन दिवस प्रगती साध्य करत आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी सांगितले.
सहकारी बैंकिंग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणारे पुरस्कार हे पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या सक्षम नेतृत्वाचे, आर्थिक स्थैर्याचे आणि उत्कृष्ट सेवाभावाचे प्रतीक मानले जात आहे व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी सांगितले.
तसेच या समिट अंतर्गत परिसंवादा मध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सायबर सिक्युरीटी, डेटा प्रायव्हसी व ट्रस्ट या विषयांवर मार्गदर्शन केले.






