अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

SHARE NOW

पिंपरी, प्रतिनिधी :

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कुल, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी सांगवी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांची परेड पार पडली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला व भारताचे संविधान विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मानवी मनोरे उभारून संघ भावनेची शिकवण देण्यात आली. तसेच देशप्रेम व एकतेची ताकद नृत्यातून सादर केली.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अतुल शितोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षा आरती राव यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत सुजान नागरिक बनण्याचे आवाहन केले. प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगून नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page