पुणे ग्रामीण पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी अल्पवयीन मुलींसह महिलांचे अपहरण करून त्यांना मारहाण करत त्यांचेवर लैंगिक अत्याचार करणारा व महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यातील पोलीसांचे रडावर असणारा आंतरराज्य टोळीचा म्होरक्या केला जेरबंद

SHARE NOW

लोणावळा :

माहे सप्टेंबर २०२३ मध्ये स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी लोणावळा उपविभागास तत्कालीन नेमणूक असणारे मा. एस.डी.पी.ओ. श्री सत्यसाई कार्तिक, (भा.पो.से.) यांचे नेतृत्वाखाली पथकास बातमी मिळाली होती की, लोणावळा परीसरातील कांतीनगर हनुमान टेकडी परिसरात लुटमार करण्यात येत असून ते आरोपी अल्पवयीन मुलींना व महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांचेकडून काम करून घेतात अशी बातमी मिळाली होती त्या गोपनीय बातमीचे आधारे आरोपी नामे १) राज सिदधेश्वर शिंदे, वय २५ वर्षे, रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे यास २) ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे वय ४१ वर्षे, रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता, १) लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ३८४/२०२३ भा.दं. वि.का.क.३९४,३४ २) लोणावळा शहर पोस्टे गुरनं २२/२०२३ भा.दं.वि.का.क. ३९४,३४ प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते. सदर कारवाई चे वेळी या टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे हा पळून गेला होता.

 

टोळीचा म्होरक्या असलेला फरार आरोपी बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार याने इतर साथीदारांचे मदतीने लोणावळा स्टेशनचे बाहेरील परीसरातून एका महिलेस चाकूचा धाक दाखवून पळवून नेले आणि राहते घरी नेवून कोंडून ठेवले, तिच्या कडील मोबाईल व रोख रक्कम तिला मारहाण करून काढून घेतली व तिचेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आरोपीचे घरात मिळून आलेल्या पिडीत महिलेने सांगितली. तसेच पिडीत महिलेची सुटका करतेवेळी त्या ठिकाणी आणखी दोन बालके (अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा) मिळून आले होते, त्यांना देखील पळवून आणून घरात साखळीने बांधून डांबून ठेवले. तिला उपाशी ठेवून घरातील काम करायला लावून हाताने, सळईने मारहाण केली तसेच तिचेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले असून अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यास डांबून ठेवून त्याचेकडून देखील कामे करून घेत असल्याची माहिती समोर आली होती.

पुणे ग्रामीण पोलीसांनी पिडीत महिला, दोन बालके यांची सुटका केली त्यावेळी आरोपींवर १) लोणावळा शहर पोस्टे गु र.नं. ४१०/२०२३ भा.दं.वि.का.क. ३७६ (ड), ३७६ (२) (एन), ३९४, ३४४, ३६३, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे आणि २) लोणावळा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०९/२०२३ भा.दं.वि.का.क. ३७६ (ड), ३७६ (२) (एन), ३९४, ३४४, ३६३, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ पोक्सो अॅक्ट कलम ४,६,८,१०,१२ सह अल्पवयीन न्याय कायदा कलम ७५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.

Advertisement

वरील गुन्हयांमध्ये आरोपी बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार हा फरार होता, त्याचेवर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात देखील अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याचे तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे सदरचा आरोपी सुमारे दोन वर्षापासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक हे सदर आरोपीची माहिती घेत असताना सदरचा आरोपी कलबुर्गी कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाली होती, आरोपी बेताब पवार हा सराईत गुन्हेगार असल्याने स्था.गु.शा., लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पो स्टे कडील अधिकारी अंमलदार यांचे एक पथक कलबुर्गी येथे गेले होते. पाहिजे आरोपी बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार उर्फ सालट वय ५० वर्षे रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे यास मालखेड पोलीस स्टेशन कर्नाटक येथील पोलीस चे मदतीने ताब्यात घेण्यात आले. त्यास पथकाने सोबत आणून लोणावळा शहर पो स्टे चे ताब्यात दिले असून त्यास मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्याची ०५ दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.

सदरचा आरोपी हा पुणे ग्रामीण जिल्हयाचे अभिलेखावर वरील गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी आहे. त्याचेवर महाराष्ट्रात पुणे ग्रामीण जिल्हयात ०४ गुन्हे, गुजरात राज्यात ०२ गुन्हे, कर्नाटक राज्यात ०१ दाखल असून अपहरण व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो या गुन्हयांमध्ये फरार असून तो वेगवेगळया राज्यात जावून त्यास कायदेशीर अटकेपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत होता. तो साबरमती कारागृहातून तात्पुरत्या जामीनावर बाहेर आला होता, तो पुन्हा कारागृहात हजर झालेला नाही.

 

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल सो, पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साो, पुणे विभाग, मा एस.डी.पी.ओ. श्री गजानन टोम्पे लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पो स्टे चे पो. नि. राजेश रामाघरे, लोणावळा ग्रामीण पो स्टे चे पो.नि. दिनेश तायडे तसेच लोणावळा ग्रामीण पो स्टे चे श्रेणी पौसई प्रकाश वाघमारे, स्था गु.शा.चे अंमलदार तुषार भोईटे, सागर नामदास, लोणावळा शहर पो स्टे चे अंमलदार रईस मुलाणी, राहुल चोरगे, चापोहवा संतोष साठे यांनी केली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page