कामशेत खिंडीत व्यवसायिकाला मारहाण करत लुटले,चार अनोळखी जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SHARE NOW

कामशेत:

Advertisement

मावळ तालुक्यातील कामशेत खिंडीत मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी व्यावसायिकाला अडवून मारहाण करत चार जणांनी लुटले यावरून कामशेत पोलीस ठाण्यात चार अनोळखी जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालचंद्र लहू काटावडे(वय ४२ राहणार.अजिवली तालुका खालापुर.रायगड) असे व्यवसायिकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काटावडे हे कामशेत खिंडीतून त्यांच्या दुचाकी वाहनाने जात असताना चार अनोळखी इसमानी त्यांना खिंडीत अडविले व मारहाण करत त्यांच्या जवळील फोन. रोख रक्कम व दुचाकी असा एकूण एक लाख दोन हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून घेत घटनास्थळावरून चौघेही पसार झाले. चौघा अनोळखी चोरट्या च्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय शेडगे पुढील तपास करत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page