कामशेत गोवित्री रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
नाणे: कामशेत गोवित्री या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे पाण्याने भरलेल्या ठिकाणामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिकच तीव्र बनली असून अपघाताच्या घटनाही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी. शेतकरी. नोकरदार. व्यापारी व श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे येणारे भाविक पर्यटक यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. शालेय वाहनांसह खाजगी वाहनांचा वापर या मार्गावरून मोठ्या प्रमाणात केला जातो मात्र रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा खड्डे चुकवताना वाहनांचे अपघात झाले आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गंभीर अपघाताची शक्यता निर्माण होत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान होत आहे. वाहने चालवताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने प्रवासी वर्गातून व परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या खड्ड्यांच्या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग. आमदार सुनील शेळके यांनी त्वरित लक्ष द्यावे व रस्त्याच्या डागडुजी साठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी गोवित्री. कांब्रे.थोरण. कोळवाडी. वळवंती. कोंडीवडे. जांभवली च्या ग्रामस्थांनी व वाहन चालकांकडून सातत्याने केली जात आहे.





