देहुगाव – देहूरोड रस्ता दुरुस्त करण्याची मागणी,माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले
देहुगाव: देहुगाव -देहुरोड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे या वर्दळीच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झेंडे मळा ते हगवणे मळा. काळोखे मळा. देहूरोड डि ए डि ते देहुगाव या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देहूगाव ते देहूरोड रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून त्या खड्ड्यात चिखल सासला असून दुचाकी चारचाकी वाहने घसरून अपघात होत आहे तसेच शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक. भाजीपाला बाजारात घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागत असून देहूगाव येथे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्याने भाविकांमध्ये देखील नाराजीचा सूर पाहिला मिळत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना देखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या समस्येचे गांभीर्य ओळखून माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन देहूगाव- देहूरोड रस्ता तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या समवेत देहुगाव देहूरोड परिसरातील स्थानिक ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.





