शेतकरी, रस्ते आणि ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर भाजप सोशल मीडिया मावळ तालुक्याचे निवेदन प्रशासनाला इशारा – मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा आंदोलन उभारू!

SHARE NOW

मावळ, ता. १३ :

मावळ तालुका मेहनती शेतकरी, कामगार आणि प्रामाणिक जनतेसाठी ओळखला जातो. मात्र सध्या तालुक्यातील जनता विविध गंभीर समस्यांना सामोरी जात आहे. भात पिकांवर करपा रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. महिनोनमहिने कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हताश झाले आहेत.

 

त्यातच तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठे संकट ठरत आहे. तसेच ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल दाखले उपलब्ध न झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भाजपा सोशल मीडिया मावळ तालुका तर्फे आज तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

 

मुख्य मागण्या

 

➡️ करपा रोगग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती भरपाई द्यावी.

➡️ रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून प्रवाससुविधा सुरळीत करावी.

Advertisement

➡️ ग्रामपंचायतींमधून नागरिकांना डिजिटल दाखले त्वरित उपलब्ध करून द्यावेत.

 

निवेदन स्विकारताना नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी भाजपने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, जर मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर मोर्चा, धरणे व तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.

 

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर

 

भाजपा आंदर मावळ मंडल अध्यक्ष अभिमन्यूभाऊ शिंदे, युवा नेते संतोषभाऊ सातकर, मावळ तालुका माजी संयोजक रविभाऊ शिंदे, समिरभाऊ भोसले, संतोषभाऊ आसवले, विठ्ठल तुर्डे, करण गोणते, प्रतीक घोडेकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“मावळ तालुक्यातील शेतकरी आणि जनता एकटी नाही.

भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

ही लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरू राहील!”


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page