संस्कार हीच खरी संपत्ती – डॉ. शाळिग्राम भंडारी लोणावळा येथे आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
लोणावळा:

लोणावळा : ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे डॉ. शाळिग्राम भंडारी, श्रीमती सुरेखा जाधव, श्री नंदकुमार वाळुंज, धीरूभाई कल्यानजी, प्राचार्य नरेंद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते विजय राव, सौं. आशा राव, लायन भरत पोतदार, घनश्याम केळकर, परिजा भिलारे, अनिल गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. संघाची प्रार्थना मृदुला पाटील, संध्या गव्हले व शारदा आगरवाल यांनी सादर केली. बिल्वा मोरे हिने गणेश वंदना नृत्यरूपात सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने वैजयंता म्हाळसकर, सविता शिंदे, युनिता पत्राव, कुमार चोरघे, भटू देवरे, सतीश माळी आणि राजघर अहिर राव यांचा गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघाचे सत्यनारायण आगरवाल यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार झाला. कार्यक्रमात ज्योती रांगणे यांनी आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
अध्यक्ष श्री. तिखे यांनी प्रास्ताविक सादर केले तर रश्मी शिरसकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
डॉ. भंडारी यांचे प्रेरणादायी विचार:
डॉ. शाळिग्राम भंडारी म्हणाले,
> “संस्काराने प्राप्त झालेले सौंदर्य हेच व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती असते. आई-वडील आणि गुरुजन हीच खरी संस्काराची विद्यापीठे आहेत. शिक्षकांचा सन्मान म्हणजे संपूर्ण समाजात सकारात्मकतेचा संदेश देणे आहे. जर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती संस्कारांनी समृद्ध झाली तर एक सुदृढ व निरोगी समाजाची उभारणी शक्य आहे.”
त्यांच्या ओजस्वी विचारांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि कार्यक्रम टाळ्यांच्या गजरात संपन्न झाला.






