टीजीएच- ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरने कर्करोग निदानाकरिता उचलले महत्त्वाचे पाऊल ३० मार्चपर्यंत मोफत ओपीडी सुविधा
तळेगाव – एकाच छताखाली कॅन्सरचे सर्वांगीण उपचार उपलब्ध करून देणा-या तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने ३० मार्चपर्यंत मोफत ओपीडी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत याठिकाणी या मोफत ओपीडीचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
सर्वोत्तम कँन्सर रूग्णालय म्हणून ओळखल्या जाणा-या टिजीएच – आँन्को लाईफ कँन्सर केअर सेंटरने वैदयकिय विश्वात कर्करोगींमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे.
अद्ययावत तंत्रप्रणालीसह, अनुभवी डाँक्टरांच्या सहाय्याने रेडिएशन, केमोथेरपी व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सेंटरमधील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर कर्मचारी हे उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतलेले कॅन्सर तज्ञ उपलब्ध आहेत.पुर्वी कर्करोग म्हटल्यावर रूग्ण आणि नातेवाईक पुर्णत: कोलमडून जायचे परंतू आता जनमानसात त्याबद्दल झालेली जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या रूग्णांचे जीवनमानही वाढले आहे. रूग्णसेवा हा एकमेव उद्देश बाळगून अधिकाधिक जनजागृती करण्याचा प्रयत्न या सेंटरच्या माध्यमातून केला जात आहे. जास्तीज जास्त नागरिकांनी टीजीएच- ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर वतीने आयोजित मोफत ओपीडीचा लाभ घ्यावा असे आव्हान सेंटरच्या वतीने केले जात आहे.
मोफत ओपीडीचा लाभ घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
८१२ ८१२ ३०६७ / ८१२ ८१२ ४०६७