खांडी व परिसरातील आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर — 200 जणांनी घेतला लाभ
मावळ:
मावळ लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सुचनेनुसार अंदर मावळ मधील खांडी व आजूबाजूच्या गावांतील आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत टाकवे बु. ग्रामीण उप रुग्णालय व कान्हे जिल्हा उप रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. शिबिरामध्ये रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच इतर शारीरिक तपासण्या करण्यात आल्या. या वेळी सुमारे 200 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, संघटक मदन शेडगे, उपतालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, अंदर मावळ संघटक रमेश नगरकर, सरपंच कुंडलिक निसाळ, माजी सरपंच अनंत पावशे, सदस्य सुभाष देशमुख, शिवाजी म्हसे, तानाजी पिंगळे, सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश ढवळे, डॉ. रिशा नागेश, डॉ. राजू तडवी, डॉ. बसवेश्वर हँगरे, डॉ. उमेश काळे तसेच श्रीमती मधुप्रिया ओव्हाळ, श्री अमित बांगडे, श्रीमती आरती नाईक, संजय सावंत, अजीम शेख व इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. शासनाच्या वतीने सर्व तपासण्या करून शिबिर संपन्न झाले.






