श्री क्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावरून १६ वर्षीय मुलगी दरीत पडली, मंदिराचे महंत ठरले देवदूत
शेलारवाडी:
मावळ तालुक्यातील प्राचीन घोरवडेश्वर डोंगरावर देवदर्शनासाठी आपल्या पालकांबरोबर आलेली १६ वर्षीय मुलगी पाय घसरून किमान ७०ते ८० फूट खोल दरीत पडली ही घटना श्री क्षेत्र घोरवडेश्वर देवस्थानचे महंत अमरनाथ बाबा यांना कळताच बाबा स्वतः त्या दरीत उतरले व त्या १६ वर्षीय मुलीला वाचविले. मुलीच्या हाता पायाला खरचटले असून पडल्यामुळे तिला वर येता येत नव्हते आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११: वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बाबांनी केलेल्या मदतीमुळे मुलींच्या पालकांनी त्यांचे आभार मानले व तुमच्यामुळे आमची मुलगी सुखरूप आम्हाला मिळाली असे सांगितले. यावेळी अमरनाथ बाबांच्या मदतीला घोरवडेश्वर देवस्थानचे पुजारी हरी महाराज बोडके. पुरातत्व विभागाचे कर्मचारी संदीप पडवळ. रोहित कुमार. शिवभक्त नंदकुमार बोडके व त्यांचा मुलगा तसेच प्रसाद कोळी हे बाबांच्या मदतीला याप्रसंगी धावले. बाबांनी मोठे धाडस दाखवत त्या मुलीला सुखरूप पणे दरीतून बाहेर काढल्याने त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






