ऑल सेंट्स हायस्कूलचा नेहमीप्रमाणे यंदाही दहावीचा शंभर टक्के निकाल. चार्मी पटेल ही विद्यार्थिनी प्रथम

SHARE NOW

पिंपरी चिंचवड :

यंदा संपूर्ण राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल चांगला लागला. त्यामध्ये ऑल सेंट्स हायस्कूलचा नेहमीप्रमाणे यंदाही दहावीचा शंभर टक्के निकाल लागला.

1. प्रथम क्रमांक – चार्मी पटेल (93.80%)

2. द्वितीय क्रमांक – आयुष कांबळे (92.20%)

3. तृतीय क्रमांक – अर्पित गजभिये (91.40%)

या विद्यार्थ्यांनी यश मिळवून यशाचे मानकरी ठरले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ जस्सी जयसिंग, संचालक जयसिंग डी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे.

Advertisement

शाळेचे संचालक जयसिंग डी व डेव्हिड पिल्ले यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दहावीच्या परीक्षेत उच्चांक गाठत 100% निकालाची परंपरा शाळेने कायम राखली. परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त तास घेऊन त्यांना प्रत्येक विषयात परिपक्व करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले

अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

 

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page