भरधाव वेगात गाडी चालवून हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या आरोपीस अटक

SHARE NOW

वडगाव (मावळ):

वडगाव मावळ पोलीस स्टेशन येते भारतीय न्याय संहिता कलम १०३ व इतर कलमानव्ये गुन्हा दाखल असून त्याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे. की,यातील मयत हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे नेमणूक वडगाव पोलीस स्टेशन हे दिनांक 13/05/2025 रोजी वडगाव फाटा येते वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते तसेच वडगाव मावळ पोलीस स्टेशन चे Api शीतलकुमार डोईजड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना अक्षय पैलेस, वडगाव कमानी जवळ त्याना मुंबई बाजूकडून तळेगाव बाजूकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली की वाहन क्रमांक. HR 74 B 3677 चा चालक हा अतिशय धोकाधायक रित्या वाहन चालवत असून त्याला जर तत्काळ थांबवले नाहीतर तो खूप मोठा अपघात करून निष्पाप नागरिकांचे बळी घेवू शकतो. सदर च्या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासकीय वाहनावरील चालक श्री गणपत होले यांनी सदर ची माहिती कॉल करून तितून पुढे. १ km अंतरावर वडगाव नाका येते वाहतूक नियमनाचे काम करत असणारे हेड कॉन्स्टेबल धेंडे याना दिली. त्यावरून श्री धेंडे यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी तत्काळ त्यांच्या सोबत च्या ट्रॅफिक वार्डन व नागरिकांच्या मदतीने सदर वाहन मुंबई चाकन लेणवर पूजा होटल च्या समोर थांबविले. त्यावेळी सदर वाहनातील चालक ‘निचे आता हू’असे बोलला. सदर वाहन थांबले असल्याने हेड कॉन्स्टेबल धेंडे हे त्या वाहनाच्या पुढे डाव्या बाजूला उभा असताना अचानक सदर वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन अतिशय वेगाने चालवून श्री धेंडे हे पुढे उभे असताना त्याना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ठोस मारून जखमी करून चाकण बाजूकडे निघून गेला. त्यांनतर हेड कॉन्स्टेबल धेंडे याना तत्काळ उपचारासाठी पवना हॉस्पिटल येते भरती केले असता डॉक्टरांनी त्याना मयत घोषित केले.

Advertisement

त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी वाहन चालकविरोधात श्री कुंडलिक पंढरीनाथ सुतार, क्य-40 वर्षे, धंदा ट्राफिक वॉर्डन, रा. मु.आढे, पोस्ट-उर्से, ता. मावळ, जि. पुणे, मो.नं. 9970416635.यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 163/2025 बी. एन. एस. कलम 103(1), 281, सह मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 177,183,184 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपासात मा. श्री पंकज देशमुख,पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण . मा रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, मा अमोल मांडवे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक गोष्टींच्या आधारे तपास सदर गुन्ह्यातील वाहन व आरोपी याना श्री अविनाश शिलीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्नवेशन विभाग पुणे ग्रामीण यांच्या पथकाने पिंपरी चिंचवड पोलीसंच्या मदतीने सदर गुन्ह्यतील आरोपीं 1) रोहन इसब खान, वय -24 वर्ष, धंदा -ड्रायव्हर, रा – ग्राम-सिंगार, तहसील = पुनाना, ठाणा -हिंदाना, जिल्हा – मेवात, राज्य – हरियाणा

2) उमर दिन मोहम्मद, वय 19 वर्ष, धंदा – क्लिनर, रा- ग्राम बरसाना, तहसील – छाता,थाना- मथुरा, राज्य उत्तर – प्रदेश

याना ताब्यात घेतले. सदर आरोपीना अटक करण्यात असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री कुमार कदम, पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हे करत आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page