रोजा इफ्तार कार्यक्रमातून घडले सर्वधर्मीय प्रेमाचे दर्शन
कामशेत :
शनिवार दिनांक 22 मार्च रोजी कामशेत मधील दत्त कॉलनी या ठिकाणी सामाजिक कार्यकते कमरूद्दीन शेख, शेख फिरोज पटेल,उमरशेख, व मुस्लिम समाजातील महिलांनी एकत्र येऊन रोजा इफ्तारपार्टी चे आयोजन केले होते.या रोजा इफ्तार कार्यक्रमास कामशेत ग्रामपंचायतच्या सदस्या कविता काळे, मीना मावकर, नेवाळे मामी, नंदा काटकर,इत्यादी सर्व धर्मीय महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमातून सर्व धर्मीय सामंजस्य आणि स्नेहाचे दर्शन यावेळी घडले.या रोजा इफ्तार चे
आयोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते कमरूद्दीन शेख यावेळी
म्हणाले की उपवासाचा हा काळ आत्मशुद्धीचा काळ असून
सर्व धर्मीयांनी एकत्र राहणे ही भारताची खरी गरज आहे.