आळंदीत मोफत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद महिलांनी आरोग्याची काळजी प्राधान्याने घ्यावी :- प्रकाश काळे
आळंदी ( प्रतिनिधी ) : वाढत्या स्पर्धेच्या तसेच धावपळीचे युगात महिला आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. महिलांनी यासाठी दुर्लक्ष न करता काहीही झाले तरीआपल्या आरोग्याची काळजी घेत दक्षता बाळगत आरोग्याचे तपासनीस प्राधान्य देण्याचे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले.
आळंदी काळेवाडीतील काशी विश्वेश्वर मंदिरात बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड, हॅन्ड इन हॅन्ड इंडिया, आळंदी महिला बचत गट महासंघ यांच्या संयुक्त वतीने आयोजित महिलांचे आरोग्य तपासणी शिबिरास महिलांनी मोठा प्रतिसाद देत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आळंदी काळेवाडीतील ११६ महिलांनी लाभ घेतला.
या प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, जेष्ठ नागरीक शाबाजी काळे गुरुजी, बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे, आळंदी शहर भाजप कार्याध्यक्ष बंडूनाना काळे, बाबुराव काळे, रमेश वाबळे, ज्ञानेश्वर काळे, बापूसाहेब दळवी, शिवसेना शाखा आळंदी रोहिदास कदम, विवेकानंद गिरी, सुदर्शन कासार, आदित्य वाजे, राजश्री गाडीवान, शालन मेदनकर, ललिता कदम, सोनाली रत्नपारखी, संगीता दाभाडे, मेघा काळे, सुरेखा काळे, कल्पना बोंबले, मथुरा नानवटे, हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेच्या सारिका शिंदे, अक्षदा लालगुडे, रत्ना आंबेकर, निकिता यादव, सरस्वती ठाकूर, सारिका दडस आदि उपस्थित होते. प्रकाश काळे यांनी विशेष मार्गदर्शन करीत महिलांनी आपल्या आरोग्य समस्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
या शिबिरात सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, महिलांचे आरोग्य आणि इतर सामान्य आजार अशा विविध आजारावर तपासणी, मार्गदर्शन व मोफत औषध उपचार करण्यात आले. रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळेगाव येथील डॉ. विष्णू वाघमारे, फर्म्यासिस्ट आदित्य शिंदे, नर्स रोजमेरी गोर्डे, महिला बॅच गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे यांचे विशेष सहकार्य झाले. या शिबिरास बेलस्टार मायक्रो फायनान्स पुणे विभागीय प्रमुख राहुल भोसले, पुणे प्रदेश व्यवस्थापक विजय बदाडे, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सूत्रसंचालन अक्षदा लाल गुडे यांनी केले. आभार सुवर्णाताई काळे यांनी मानले.