*श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा*
तळेगाव दाभाडे :
“अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय मुहूर्तावर” शुक्रवार, दिनांक – १० मे २०२४ रोजी श्री बनेश्वर मंदिर तळेगाव दाभाडे येथील श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा व एकतारी भजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चंदन उटी सोहळ्याचे हे २४ वे वर्ष असून या वर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . या वर्षी ०५ किलो चंदनाचा लेप महादेवाच्या शिवलिंगाला लावून तसेच विविध प्रकारच्या 100 किलो फुलांची आकर्षक सजावट करून भव्य असा चंदन उटी सोहळा साजरा करणार आहे.
श्री बनेश्वर सेवा मंडळ व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी या मुहूर्तावर हा सोहळा आयोजीत केला जातो.
अक्षय्य तृतीया हा एक पवीत्र मुहूर्त आहे. या दिवशी केलेल्या शुभारंभाचे फल हे अक्षय्य राहते. साडेतीन मुहूतपैिकी एक मुहूर्त असलेला हा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया होय. याच दिवशी भगवान विष्णुंचा सहावा अवतार असेलल्या भगवान परशुरामांचा जन्म झाला. याच दिवशी व्यासमुनिंनी श्री गणेशाला महाभारत सांगुन त्याच्याकडुन लेखन करवुन घेतले. अनादीकाळापासुन हा सण साजरा केला जात असुन, महाभारत, स्कंदपुराण, भविष्यपुराण आदी ग्रथांत या सणाचा उल्लेख आढळतो. या तिथीला दानधर्म, होमहवन, परोपकार, पुजा, भजन केले तर ते कधीही क्षयाला जात नाही. म्हणुन या दिवशी दानधर्म व नविन कार्याला सुरूवात केली जाते. चैत्र व वैशाख या दोन महिन्यांतला अक्षय तृतीया हा दुवा आहे. वैशाखाच्या झळा असहय होत असताना अक्षय तृतीयेचा गाभा लक्षात घेऊन पाण्याचे कलश दान केले जातात व मंदिरातील मुर्तीना चंदनाचा लेप लाऊन शीतल करतात .
*चंदन उटी सोहळा – सकाळी ११ ते सायं ०६ वाजेपर्यंत*
*नित्य महाआरती – सायं ०७ वाजता*
*महाप्रसाद – रात्री ७.३० वाजता*
*एकतारी भजन सोहळा – रात्री ०७ ते १० पर्यंत*
तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हि नम्र विंनती