आदर्श माता भिमाबाई रामचंद्र भेगडे यांचे दुःखद निधन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: येथील धार्मिक, शांत आणि स्नेहशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या आदर्श माता भिमाबाई रामचंद्र भेगडे (वय ७७) यांचे गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

 

भिमाबाई भेगडे यांनी आपल्या साध्या, संयमी आणि संस्कारमय जीवनातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. परिसरातील अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. त्यांच्या ममतेच्या छायेखाली मोठा परिवार एकत्र नांदत आहे .

 

त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे तसेच पुतणे असा मोठा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते पिराजी भेगडे यांच्या मातोश्री होत, तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते संतोष छबुराव भेगडे यांच्या त्या आजी होत.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page