वीज बिलांची दुरुस्ती आळंदीत करा :- रोहिदास कदम उपकार्यकारी अभियंता गोरे यांना साकडे
आळंदी ( प्रतिनिधी) : आळंदी पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात वीज बिलांची दुरुस्ती वीज महावितरणच्या कामकाजामुळे करावी लागत आहे. यामुळे आळंदी पंचक्रोशीतील वीज बिलांची दुरुस्ती आळंदी येथील वीज महावितरणचे कार्यालयात कायम स्वरूपी बीज दुरुस्तीची व्यवस्था करून गैरसोय दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम यांनी केली आहे.
या संदर्भात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रोहिदास कदम यांनी चाकण येथील वीज महावितरण कार्यालय चाकण चे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, अर्जुन मेदनकर, कैलास पाचुंदे आदी उपस्थित होते. या बाबत कदम म्हणाले, आळंदी येथील कार्यालयात या पूर्वी वीज बिल दुरुस्ती होत होती. सद्या वीज बिल दुरुस्ती साठी चाकण कार्यालयात वीज ग्राहकांना पाठविले जाते. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास आणि गैरसोय होत आहे. पूर्वी प्रमाणे आळंदी येथील वीज वितरण कार्यालयात वीज बिल दुरुस्ती होण्याचे संबंधित यांना सूचना करण्याची मागणी करण्यात आली आहे. आळंदी येथील वीज महावितरण कार्यालयात वीज बिल दुरुस्तीचे कामकाजास येत असलेले अधिकारी, कर्मचारी यांचे कामकाज बाबत परिसरात जनजागृती वीज महावितरण कार्यालयाने करावी. आळंदी शहरात वीज मीटर चे रीडिंग नियमित होत नाही. अंदाजे वीज वापराचे बिल देऊन अंदाजे बिले दिली जातात..यामुळे मीटर प्रमाणे दर महा मीटर चे रीडिंग घेतले जाणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे वीज बिल मीटर रीडिंग संबंधित कर्मचारी यांना सूचना देण्याची मागणी कदम यांनी केली आहे.
आळंदी परिसरात वीज बिले देखील नियमित तात्काळ वीज ग्राहकांना मिळत नाहीत. वीज ग्राहकांना बिले नियमित वेळेत भरण्यास मिळाल्यास ग्राहकांना वीज सवलतीचा फायदा होईल. मात्र वेळेत बिले मिळत नसल्याने सवलत मिळत नाही. तसेच बिले विलंबाने वाटप होत असल्याने बिल मिळाल्यावर बिलाची आर्थिक तरतूद करून भरण्यास किमान अवधी मिळत नाही. यामुळे वीज ग्राहकांना वीज विलंब आकार द्यावा लागतो. वीज ग्राहकांना वीज बिल भरणा सवलत मिळण्यासाठी वेळेत बिले देण्याची मागणी कदम यांनी वीज ग्राहकांचे वतीने केली आहे.
आळंदीतच वीज बिले दुरुस्ती करणार :- उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे
या संदर्भात उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे म्हणाले, या पुढील काळात वीज ग्राहकांना नियमित वेळेवर वीज बिले मिळतील. तसेच वीज पुरवठा मीटर प्रमाणे रीडिंग घेण्यासाठी नियमित रीडिंग घेण्यासाठी संबंधित यांना कळविले जाईल. या पूर्वी आळंदीत वीज बिले दुरुस्ती केली जात होती. मात्र संबंधित कर्मचारी यांना वीज ग्राहक इतर प्रश्न विचारणा करीत काम नसताना त्या बाबत माहिती देण्यासाठी वेळ जात होता. मात्र आता या पुढील काळात निश्चित ठराविक वार आणि वेळ देऊन आळंदीतच वीज बिल दुरुस्तीसाठी कामकाज सुरु केले जाईल अशी ग्वाही गोरे साहेब यांनी दिली.